Breaking News

T20 World Cup| वेस्ट इंडिजने दाखवली ताकद, युगांडाचा 39 धावांत खुर्दा उडवत सुपर 8 कडे कूच, होसेनचा पंजा

t20 world cup
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) यजमान वेस्ट इंडिज व युगांडा (WIvUGD) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. यजमान संघाने आपण या स्पर्धेत का विजेतेपदाचे दावेदार आहोत हे या सामन्यात दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभारल्यावर, अकिल होसेन याच्या (Akeal Hosein) जादुई फिरकीच्या जोरावर त्यांनी युगांडाचा डाव केवळ 39 धावांमध्ये संपवला. पाच बळी घेणारा अकिल सामनावीर ठरला.

गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजने सावध सुरुवात केली. किंग 13 धावा करून परतल्यावर पूरन 22 धावा करून बाद झाला. सलामीवीर जॉन्सन चार्ल्स याने 44 धावा केल्या. तर कर्णधार पॉवेल याने 22 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजच्या 15.3 षटकात केवळ 125 धावा झालेल्या असताना, आंद्रे रसेल याने 17 चेंडूंमध्ये 30 धावा करत संघाला 173 पर्यंत नेले. युगांडासाठी कर्णधार मसाबाने दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना, युगांडाला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. या धक्क्यातून संघ सावरू शकला नाही. त्यांना प्रत्येक षटकात धक्का बसला. अकिल होसेन याने केवळ 11 षटकांत 5 बळी मिळवले.‌ युगांडाचा संघ बारा षटकातच केवळ 39 धावांवर गारद झाला. ही टी20 विश्वचषकातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.

(T20 World Cup 2024 West Indies Trash Uganda By 134 Runs Akeal Hosein Took 5 Wickets)

3 comments

  1. Greetings! I know this is kind of off topic but I was wondering which blog platform are you using for this site? I’m getting fed up of WordPress because I’ve had problems with hackers and I’m looking at alternatives for another platform. I would be awesome if you could point me in the direction of a good platform.

  2. I like this post, enjoyed this one thank you for putting up. “To affect the quality of the day that is the art of life.” by Henry David Thoreau.

  3. When I originally commented I clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now each time a comment is added I get four emails with the same comment. Is there any way you can remove me from that service? Thanks!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version