Breaking News

T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाने उतरवला हुकमी एक्का! आयपीएल स्टार थेट वर्ल्डकप संघात

T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, सर्व संघांनी आपापले प्राथमिक संघ जाहीर केले आहेत. विश्वचषकासाठी अंतिम संघ घोषित करण्याची तारीख जवळ आली असतानाच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता आपल्या आधी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंना देखील विश्वचषकासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करेल. या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. असे असतानाच आता अष्टपैलू मॅट शॉर्ट व आयपीएल गाजवलेला युवा सलामीवीर जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांना राखीव खेळाडू म्हणून अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास व स्पर्धेतून बाहेर पडल्यास यापैकी एकाला संधी मिळेल.

जॅक फ्रेझर-मॅकगर्क याने या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना विशेष छाप पाडली. त्याला स्पर्धेत केवळ नऊ सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वजण प्रभावित झाले. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यात तो तरबेज आहे. विशेष म्हणजे दोन वेळा त्याने केवळ पंधरा चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. या हंगामात 330 धावा फटकावताना तब्बल 234 चा स्ट्राइक रेट राखला. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियासाठी केवळ दोन वनडे सामने खेळले आहे.

तर, मागील वर्षभरापासून ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या आसपास राहिलेला अष्टपैलू मॅट शॉट हा देखील विश्वचषकासाठी जाईल. त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत चार वनडे व नऊ टी20 सामने खेळले आहेत. तो आक्रमक फलंदाजी तसेच मध्यमगती गोलंदाजी करू शकतो.

टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ- मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, जोस इंग्लिस, एश्टन एगर, ऍडम झंपा, पॅट कमिन्स, जोस हेजलवूड, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस.

ट्रॅव्हलींग रिझर्व्ह- जॅक फ्रेझर-मॅकगर्क, मॅट शॉर्ट.

(Jake Fraser-Mcgurk And Matt Short Including In Australia T20 World Cup Sqaud As Traveling Reserves)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version