Breaking News

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी Team India ची घोषणा! शुबमनकडे नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ

team india
Photo Courtesy: X

Team India For Zimbabwe Tour: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2024) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत संपूर्ण युवा संघ या दौऱ्यावर खेळेल. या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल.

टी20 विश्वचषकानंतर अवघ्या आठवडाभरात ही मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे विश्वचषकात खेळत असलेल्या सर्वच खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. विश्वचषक संघातील केवळ यशस्वी जयस्वाल व संजू सॅमसन हेच या संघात खेळताना दिसणार आहेत. अनुभवी खेळाडू विश्रांतीवर असल्याने युवा सलामीवीर शुबमन गिल (Captain Shubman Gill) प्रथमच राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

या संघातील चार खेळाडूंना प्रथमच भारतीय संघात निवडले आहे. यामध्ये पंजाबचा अभिषेक शर्मा, आसामचा रियान पराग, मुंबईचा तुषार देशपांडे व आंध्र प्रदेशचा नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. तर, ध्रुव जुरेल प्रथमच टी20 संघात समाविष्ट केला गेला.

या दौऱ्यावर भारत 6 जुलै, 7 जुलै, 10 जुलै, 13 जुलै व 14 जुलै या दिवशी सामने खेळेल. हे सर्व सामने हरारे येथे होतील. भारतीय वेळेनुसार हे सर्व सामने सायंकाळी 4.30 वाजता सुरू होतील. ‌

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, तुषार देशपांडे व खलील अहमद.

(Team India Sqaud For Zimbabwe Tour Shubman Gill Lead)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version