Breaking News

अपसेट ऑफ द इयर! अवघ्या 17 वर्षाच्या Unnati Hooda ने सिंधूला चारली धूळ

unnati hooda
Photo Courtesy: x

Unnati Hooda Beat PV Sindhu: चायना ओपन 2025 (China Open 2025) स्पर्धेत एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अनुभवी पीव्ही सिंधू हिला भारताच्याच उन्नती हुडा हिने मात दिली. यासह उन्नती हिने उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली. 

Teen Sensation Unnati Hooda Beat PV Sindhu In China Open

मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असलेल्या सिंधूने पहिल्या फेरीत शानदार विजय मिळवला होता. दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे 17 वर्षाच्या उन्नतीचे आव्हान होते. मात्र, या सामन्यात उन्नती हिने डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ केला. जवळपास 73 मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिने 21-16, 19-21, 21-13 असा विजय मिळवला. सिंधू ही भारताची अव्वल बॅडमिंटनपटू मानली जाते. तिने सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदके जिंकली आहेत.

केवळ सतरा वर्षांची असलेली उन्नती भारताची भविष्यातील मोठी खेळाडू मानली जाते. हरियाणाच्या रोहतक येथे तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. तिने आत्तापर्यंत दोन मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच, भारताच्या 2022 उबेर चषक विजेत्या संघाचा देखील ती भाग होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: धक्कादायक! Saina Nehwal चा झाला घटस्फोट, 7 वर्षांचे नाते संपले

 

Exit mobile version