Breaking News

Virat-Anushka ने सोडला भारत? कायमचे झाले लंडनमध्ये स्थायिक?

virat-anushka
Photo Courtesy: X

Virat-Anushka Moving London: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताला जिंकवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तसेच त्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

टी20 विश्वचषक विजयानंतर भारतीय संघ 4 जुलै रोजी मायदेशात परतला. तो संपूर्ण दिवस संघ व्यस्त होता. दिल्ली येथे आगमन झाल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई येथे संघाची भव्य मिरवणूक निघाली. तर, दिवसाच्या शेवटी वानखेडे स्टेडियम येथे सर्व संघाचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. या संपूर्ण धावपळीनंतरही पहाटे 3 वाजता विराट कोहली लंडनला रवाना झाला.

विराट लंडनला गेल्याने भारतात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. सध्या सोशल मीडियावर विराट आपली पत्नी अनुष्का शर्मा व मुले वामिका आणि अकायसह लंडन येथे स्थायिक होणार असल्याची चर्चा सुरू दिसते. याचे महत्वाचे कारण म्हणजे विराट व त्याचा परिवार मागील काही काळापासून लंडनमध्ये दिसून आला  आहे. त्याचा मुलगा अकाय याचा जन्म देखील तेथेच झाला. मागील वर्षी वनडे विश्वचषक संपल्यानंतर देखील विराट लंडनमध्येच दिसून आलेला.

विराट हा मूळ दिल्लीचा असून, मागील काही वर्षापासून मुंबईत राहतो. त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवुड अभिनेत्री आहे. त्यांनी 2017 मध्ये विवाह केला होता.

(Virat-Anushka Might Moving London Permanantly Social Media Reaction)

Exit mobile version