Breaking News

Wimbledon 2024: जोकोविच-अल्कारेझ भिडणार विम्बल्डनच्या गादीसाठी, मेदवेदेव पुन्हा अपयशी

wimbledon 2024
Photo Courtesy: X/Wimbledon

Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनची पुरुष एकेरीची अंतिम लढत (Wimbledon 2024 Final) निश्चित झाली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व तिसऱ्या स्थानी असलेला गतविजेता कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढतील.

शुक्रवारी पुरुष एकेरीच्या दोन्ही उपांत्य लढती खेळल्या गेल्या. पहिल्या लढतीत जोकोविच याच्यासमोर तेराव्या मानांकित इटलीच्या लॉरेन्झो मुसेटी याचे आव्हान होते. जोकोविच याने अनुभवाच्या जोरावर 6-4, 7-6, 6-4 असे सरळ सेटमध्ये त्याला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दहाव्या वेळी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत उतरणार आहे.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या अल्कारेझ याच्यासमोर पाचव्या मानांकित डॅनियल मेदवेदेव याने आव्हान उभे केले होते. मेदवेदेव याने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पुढचे तीनही सेट जिंकून अल्कारेझ याने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. तो सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. हा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला जाईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

तत्पूर्वी, शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित इटलीच्या जास्मिन पावलोनी हिच्यासमोर 31 व्या मानांकित चेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेजीकोवा हिचे आव्हान असणार आहे.

(Wimbledon 2024 Djokovic And Alcaraz Reach Final)

Exit mobile version