Breaking News

2024 T20 World Cup साठी निवडलेल्या टीम इंडियाचे IPL 2024 मधील रिपोर्ट कार्ड, पाहा कोणी केले टॉप

2024 t20 world cup
Photo Courtesy: X/Adidas India

2024 T20 World Cup|जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा समारोप झाला. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. आयपीएलमध्ये खेळलेले 15 भारतीय खेळाडू हे विश्वचषकासाठी देखील निवडले गेले आहेत. त्यांची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली यावर आपण कटाक्ष टाकूया.

1) रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार)- मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल विजेतेपदे जिंकून देणाऱ्या रोहित शर्माकडून यावर्षी मुंबईचे नेतृत्व काढून घेण्यात आले होते. असे असले तरी विश्वचषकात तोच भारतीय संघाचा कर्णधार असेल. यावेळी फक्त फलंदाज म्हणून खेळत असलेल्या रोहितने 14 सामन्यात 32 ची सरासरी आणि 150 च्या स्ट्राइक रेटने 417 धावा केल्या. यामध्ये एक शतक व एका अर्धशतकाला समावेश होता. ही आकडेवारी चांगली दिसत असली तरी, यापैकी सात सामन्यात तो 20 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6.5 गुण दिले आहेत.

2) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) (उपकर्णधार)- रोहितच्या जागी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिकसाठी हा हंगाम विसरण्यासारखा राहिला. कारण, मुंबईचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिल्याने त्याच्यावर प्रचंड टीका झाली. खेळाडू म्हणून देखील हार्दिक आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. सर्व 14 सामने खेळताना फलंदाजीत तो 143 च्या स्ट्राईक रेटने फक्त 216 धावा व गोलंदाजीत 10.75 च्या इकॉनॉमी रेटने 11 बळी मिळवू शकला. आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4.5 गुण दिले जात आहेत.

3) विराट कोहली (Virat Kohli)- भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या विराट कोहली याने यावर्षी आयपीएल गाजवली. आरसीबीसाठी सलामीवीर म्हणून खेळताना त्याने 61.75 व‌ 154 च्या स्ट्राइक रेटने 741 धावा केल्या. यामध्ये एक शतक व पाच अर्धशतके सामील होती. सर्वाधिक धावा बनवल्याने त्याला हंगामातील ऑरेंज कॅप देखील मिळाली.‌ आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 9.5 गुण दिले जात आहेत.

4) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)- दुखापतीमुळे हंगामातील सुरुवातीचे सामने न खेळलेल्या सूर्यकुमार यादव याच्यासाठी हंगाम संमिश्र राहिला. त्याने यंदा 11 सामने खेळताना 345 धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 167 राहिला. सोबतच त्याच्या बॅटमधून एक शतक व तीन अर्धशतके आली. असे असले तरी तो सातत्य दाखवण्याचा अपयशी ठरला. आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7 गुण‌ दिले जात आहेत.

5) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)- राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल या हंगामात तितका प्रभावी ठरला नाही. त्याने यावर्षी 15 सामन्यात खेळताना 435 धावा बनवल्या. यामध्ये एक शतक व एक अर्धशतक समाविष्ट आहे. यशस्वी यावेळी मोठ्या सामन्यांमध्ये आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्याला आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये 6 गुण देण्यात येत आहेत.

6) शिवम दुबे (Shivam Dube)- चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा अष्टपैलू शिवम दुबे हा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगला चमकला होता. मात्र, विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याने एकही मोठी खेळी केली नाही. संघाची घोषणा होण्याआधी त्याच्या नावावर 10 सामन्यात 350 धावा जमा होत्या. तर स्ट्राइक रेट 172 असा तगडा होता. मात्र, नंतर तो 4 सामन्यात त्यामध्ये केवळ 46 धावांची भर घालू शकला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 5.5 गुण दिले जात आहेत.

7) रिषभ पंत (Rishabh Pant)- जवळपास दीड वर्ष मैदानापासून दूर राहिलेल्या रिषभ पंत याने यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन केले. दिल्लीचे नेतृत्व करताना त्याने आपले नेतृत्व व फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले. त्याने 13 सामने खेळताना 155 च्या स्ट्राईक रेटने 446 धावा उभारल्या. विशेष म्हणजे त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही छाप पाडली. त्याला आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये 7.5 गुण मिळत आहेत.

8) संजू सॅमसन (Sanju Samson)- राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानेही शिवम दुबे याच्याप्रमाणे संघ निवडीपर्यंत जबरदस्त खेळ दाखवला होता. मात्र, नंतर त्याच्या कामगिरीत उतार आला. पंतनंतर भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक असलेल्या संजू याने 16 सामने खेळताना 48 च्या सरासरीने व 153 च्या स्ट्राइक रेटने 531 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या पाचमध्ये राहिला. आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7.5 गुण दिले जात आहेत.

9) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)- सीएसकेसाठी खेळणारा अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा या हंगामात तितका बहारदार दिसून आला नाही. अनेक वेळा वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाल्यानंतरही तो 14 सामन्यात 267 धावाचं बनवू शकलो. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट 142 इतकाच राहिला. तर गोलंदाजीतही 8 बळी त्याच्या खात्यात जमा झाले. आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4 गुण दिले जात आहेत.

10) अक्षर पटेल (Axar Patel)- विश्वचषकातील ज्या जागेवर सर्वधिक चर्चा झाली त्या अक्षर पटेल याला देखील विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना 235 धावा बनवल्या. मात्र, स्ट्राईक रेट 130 असा खराब राहिला. तर, गोलंदाजीतही फक्त 11 बळी त्याला मिळवता आले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4.5 गुण मिळत आहेत.

11) कुलदीप यादव (Kuldeep Yadav)- सध्या भारताचा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू असलेल्या कुलदीप यादवने आयपीएल 2024 मध्ये पुन्हा एकदा आपली कमाल दाखवली. दुखापतीमुळे केवळ 11 सामने त्याला खेळता आले. यामध्ये त्याने 9 पेक्षा कमीच्या इकॉनॉमी रेटने 16 बळी टिपले. तसेच त्याने फलंदाजीतही मोक्याच्या वेळी योगदान दिले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 8.5 गुण दिले जात आहे.

12) युझवेंद्र चहल (Yuvzendra Chahal)- राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना चहल याने सलग तिसऱ्या हंगामात दमदार कामगिरी केली. हंगामात 16 सामने खेळताना त्याने आपल्या लेग स्पिनने 18 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, यंदा त्याचा इकॉनॉमी रेट दहाच्या आसपास गेला होता.‌ आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7.5 गुण दिले जात आहेत.

13) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)– मागील संपूर्ण हंगाम दुखापतीमुळे न खेळलेल्या जसप्रीत बुमराह याने यावर्षी पुनरागमन करत आपला दर्जा दाखवून दिला. केवळ 13 सामने खेळताना त्याने 7 पेक्षा कमीच्या इकॉनॉमी रेटने 20 बळी आपल्या नावे केले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 9.5 गुण दिले जात आहेत.

14) मोहम्मद सिराज (Mo. Siraj)- आरसीबी संघाप्रमाणेच त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या ‌मोहम्मद सिराज याच्यासाठी हंगामातील पूर्वार्ध निराशाजनक राहिला होता. मात्र, नंतर पुनरागमन करत त्याने आत्मविश्वास मिळवला. त्याच्या नावे 14 सामन्यात 15 बळी जमा झाले. आपल्या या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 5.5 गुण मिळत आहेत.

15) अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)- संघातील एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंग याने पंजाब किंग्ससाठी संमिश्र कामगिरी केली. त्याला 14 सामन्यात 19 बळी मिळवण्यात यश आले तरी, त्याचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त राहिला. अखेरच्या काही सामन्यांमध्ये मात्र त्याचा फॉर्म चांगला दिसून आला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7 गुण दिले जात आहेत.

(Team India Report Card After IPL 2024 Ahead 2024 T20 World Cup)

बडा खिलाडी Mitchell Starc! आजवर खेळलेल्या प्रत्येक फायनलमध्ये संघ बनलाय चॅम्पियन, पाहा जबरदस्त आकडेवारी

5 comments

  1. Hi, Neat post. There’s a problem together with your site in web explorer, could check thisK IE still is the market chief and a huge component to other people will omit your wonderful writing because of this problem.

  2. As I website possessor I conceive the content material here is very good, thankyou for your efforts.

  3. It is the best time to make some plans for the future and it is time to be happy. I have read this post and if I could I want to suggest you some interesting things or tips. Maybe you can write next articles referring to this article. I wish to read even more things about it!

  4. Thanks for sharing excellent informations. Your web site is so cool. I am impressed by the details that you?¦ve on this site. It reveals how nicely you understand this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my friend, ROCK! I found simply the info I already searched everywhere and just could not come across. What an ideal web site.

  5. There is definately a lot to know about this topic. I like all of the points you’ve made.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version