Breaking News

ब्रेकिंग न्यूज! Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ

asia cup 2025
Photo Courtesy: X

Asia Cup 2025 Confirmed: एशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या एशिया कपची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) प्रमुखांनी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार असल्याची घोषित केले. स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला देण्यात आले आहे. 

Asia Cup 2025 Confirmed

एसीसी चेअरमन एहसान नक्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत एशिया कप युएई येथे खेळला जाईल. ही स्पर्धा टी20 स्वरूपाची होईल. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी स्पर्धेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ओमान, युएई व हॉंगकॉंग हे संघ सहभागी होतील. प्रत्येकी चार संघांचे दोन गट करण्यात आले असून, प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळेल. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात समाविष्ट असल्याचे समजते. लवकरच स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा ? Shubman Gill-Gautam Gambhir दरम्यान कडाक्याचे भांडण? वाचा काय घडल

Exit mobile version