Breaking News

COPA America 2024: मेस्सीची अर्जेंटिना पुन्हा अंतिम फेरीत, मोडून काढले कॅनडाचे आव्हान

copa america 2024
Photo Courtesy: X

COPA AMERICA 2024: अमेरिका खंडातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला गेला. गतविजेत्या अर्जेंटिना व कॅनडा (ARG vs CAN) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 असा विजय मिळवला. यासह त्यांचे अंतिम फेरीतील (COPA America 2024) स्थान निश्चित झाले.

स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी करत आलेल्या अर्जेंटिना संघासाठी अल्वारेज याने 22 व्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. त्यानंतर 51 मिनिटाला कर्णधार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने गोल करत 2-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर पूर्ण वेळेत एकही गोल झाला नाही व अर्जेंटिना संघाने विजय मिळवला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

अर्जेंटिनाने 2021 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी विश्वचषक आपल्या नावे केला. आता कोपा अमेरिका जिंकून विजयी हॅट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऊरूग्वे व कोलंबिया भिडणार आहेत.

(COPA America 2024 Argentina Reaches Final Messi Score)

Exit mobile version