Breaking News

Sultan Azlan Shah Cup 2025 फायनलमध्ये भारताचा निसटता पराभव, बेल्जियम नवा चॅम्पियन

sultan azlan shah cup 2025
Photo Courtesy: X

Sultan Azlan Shah Cup 2025 Cup Final: हॉकी विश्वातील मानाची स्पर्धा असलेल्या सुलतान अझलन शाह कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (30 नोव्हेंबर) खेळला गेला. क्वालालंपूर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला (Indian Hockey Team) बेल्जियमकडून 1-0 असा निसटता पराभव पत्करावा लागला. यासह बेल्जियमने पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्या नावे केली.

Belgium Won Sultan Azlan Shah Cup 2025

सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्याविना उतरावे लागले होते. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले मात्र यश मिळाले नाही. अखेर तिसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमच्या स्टॉकब्रोक याने गोल करत आपल्या संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर बेल्जियम संघाने काहीसा सावध पवित्रा घेतला. अखेरच्या काही मिनिटात भारताने आपल्या गोलकीपरला बाहेर बोलावून पूर्ण खेळाडूंनिशी आक्रमण केले. मात्र, गोल करण्यात भारतीय संघाला अपयश आले. अखेर बेल्जियम संघाने संयम दाखवत सामन्यात विजय मिळवला.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला सामन्यात न्यूझीलंडने यजमान मलेशियाला पराभूत करत कांस्यपदक मिळवले. न्यूझीलंडच्या सॅम लेन याने सर्वाधिक नऊ गोल करत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल

Exit mobile version