Breaking News

क्रीडा लवादाने बदलला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळाले ISL चे तिकिट

i league 2024-2025
Photo Courtesy: AIFF

CAS Announced I League 2024-2025 Winner: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल लीग असलेल्या आय लीगबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आय लीग 2024-2025 चा विजेता ठरवण्यासाठी झालेल्या सुनावणीत अखेर इंटर काशी (Inter Kashi) संघाच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे आता चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) ऐवजी इंटर काशी आयएसएलमध्ये सहभागी होताना दिसेल.

CAS Announced Inter Kashi As I League 2024-2025 Winner

आय‌ लीगच्या मागील हंगामात संपूर्ण स्पर्धेनंतर चर्चिल ब्रदर्स 40 गुणांसह विजयी ठरलेली. तर, इंटर काशी 39 गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. मात्र, इंटर काशी विरुद्ध नामधारी यांच्यातील सामन्यात नामधारी संघाने एक रजिस्ट्रेशन नसलेला खेळाडू खेळवण्याचा आरोप इंटर काशी संघाकडून करण्यात आलेला. याच प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने आपला निर्णय दिला.

इंटर काशी संघाला या सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. मात्र, लवादाने दिलेल्या निर्णयामुळे इंटर काशी संघाला त्या सामन्यातील 3 गुण मिळाले. त्यामुळे नव्या गुणतालिकेत काशी संघ अव्वल क्रमांकावर पोहोचला.‌ त्यासोबतच त्यांना आगामी आयएसएल हंगामात थेट प्रवेश मिळाला.

यासोबतच लवादाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, चर्चिल ब्रदर्स व नामधारी एफसी यांना इंटर काशी संघाला नुकसान भरपाई देखील देण्याची सूचना केली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: चेल्सीने उंचावला FIFA Club World Cup 2025! पीएसजीची अंतिम सामन्यात सपशेल शरणागती

Exit mobile version