क्रिकेट

रिटेन्शनआधीच Mumbai Indians च्या ताफ्यात तगडा ऑलराऊंडर! 2 कोटीत झाली डील

ipl 2025

Mumbai Indians Signed Allrounder Ahead IPL 2026 Retention: आयपीएल 2026 रिटेन्शनसाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहेत. मागील अनेक दिवसांपासून विविध संघ खेळाडू ट्रेड करणार असल्याच्या बातम्या समोर येतायेत. आता पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने देखील आपल्या ताफ्यात नवा अष्टपैलू सामील केल्याचे वृत्त येत आहे. विशेष म्हणजे त्या बदल्यात …

Read More »

MCA International Cricket Stadium वर रंगणार IPL 2026? या संघाचे होम ग्राऊंड म्हणून चर्चा

IPL 2026 Matches At MCA International Cricket Stadium: आयपीएल 2026 साठी अद्याप जवळपास पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.‌ असे असले तरी, स्पर्धेची चर्चा आत्ताच सुरू झालेली दिसते. आयपीएल 2026 च्या रिटेन्शनआधी पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येतेय.‌ आयपीएल 2026 मध्ये पुण्याच्या एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काही सामने होऊ …

Read More »

WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?

Freedom Trophy 2025: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2025-2027) च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) या कसोटी मालिकेला शुक्रवारी (14 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेती असलेली दक्षिण आफ्रिका भारताला घरच्या मैदानावर आव्हान देईल. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेली विजयाची लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा …

Read More »

विश्वविजेत्या Indian Womens Cricket Team ला घसघशीत बोनस! BCCI ने मनमोकळेपणे खोलली तिजोरी

BCCI Give Bonus To Indian Womens Cricket Team: रविवारी (2 नोव्हेंबर) भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवत आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक (ICC Womens Cricket World Cup 2025) जिंकला. भारताने 52 वर्षाच्या इतिहासात प्रथमच या विश्वचषकाला गवसणी घातली. त्यानंतर सर्वत्र संघाचे कौतुक होत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने …

Read More »

Amol Muzumdar चा संघर्ष कबीर खानपेक्षा मोठा होता! 37 वर्षांनी तपश्चर्या पूर्ण झाली

– महेश वाघमारे Real Life Kabir Khan Amol Muzumdar: अखेर स्वप्न पूर्ण झालं! तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या एका वर्ल्डकपची अक्षरशः चातकाप्रमाणे वाट पाहत होते, तो वर्ल्डकप आला. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत हरमनप्रीत कौरच्या महिला संघाने हा वर्ल्डकप थाटात उचलला. साऱ्या संघाचा कौतुक होत होतंच. मात्र, सोशल मीडियावर एका नावाची …

Read More »

पोरींनी जग जिंकले! भारत बनला ICC Womens Cricket World Cup 2025 चा विश्वविजेता

India Won ICC Womens Cricket World Cup 2025: भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेला. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत प्रथमच आयसीसी विश्वचषक जिंकला. India Won ICC Womens Cricket World Cup …

Read More »

AUSvIND: महिलांपाठोपाठ पुरूष संघानेही चारली ऑस्ट्रेलियाला धूळ! तिसरा टी20 भारताच्या नावे, सुंदर-अर्शदीप चमकले

AUSvIND: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेला. होबार्ट येथे झालेल्या या सामन्यात भारताने 187 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादन केला. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने केलेली आक्रमक खेळी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यासह पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली …

Read More »

मुंबईत इतिहास घडणार! भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार Womens Cricket World Cup 2025 ची फायनल

ICC Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात होत असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (2 नोव्हेंबर) खेळाला जाईल. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियमवर यजमान भारत व दक्षिण आफ्रिका (INDW v SAW) आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी विजेतेपद मिळवले नसल्याने, महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणे …

Read More »

वर्ल्डकपआधीच Kane Williamson चा धक्कादायक निर्णय, 14 वर्षाची कारकीर्द अचानक थांबवली

Kane Williamson Announced Retirement: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू व माजी कर्णधार केन विल्यम्सन याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून त्याने हा निर्णय घेतला. आगामी टी20 विश्वचषकाच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने न्यूझीलंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे. Kane Williamson Announced Retirement From T20 Cricket …

Read More »

ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण! रेकॉर्ड चेससह टीम इंडिया Womens Cricket World Cup 2025 च्या फायनलमध्ये

India Into Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरूवारी (30 ऑक्टोबर) खेळला गेला. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून पराभव केला. यासह भारताने तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली‌. …

Read More »
Exit mobile version