Breaking News

Suryakumar Yadav Catch Video : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल, सूर्याच्या कॅचमुळे ट्रॉफी आली घरी!

Suryakumar Yadav Catch :- भारतीय संघाचा 11 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. शनिवारी (29 जून) बार्बाडोसच्या मैदानावर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. 2013 नंतर भारताने पहिल्यांदाच आयसीसी चषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या या दैदिप्यमान यशामागे सूर्यकुमार यादव याचा मोठा वाटा राहिला. मोक्याच्या वेळी सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचा महत्त्वपूर्ण झेल घेत सामना भारताच्या बाजूने वळवला. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने विराट कोहलीच्या 76 धावांच्या खेळीच्या आधारे 176 धावा केल्या. भारताच्या 177 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मात्र हेन्रिच क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्सने संघाला सामन्यात परत आणले. स्टब्स पुढे 31 धावांवर अक्षर पटेलच्या हातून त्रिफळाचीत झाला. तर क्लासनेची 52 धावांवर विकेट पडली. हार्दिक पांड्याने यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून त्याला झेलबाद केले. परंतु त्यानंतरही डेविड मिलर मैदानावर टिकून होता.

डावातील शेवटच्या 20व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ 16 धावांची आवश्यकता होती. मिलरसारखा फलंदाज मैदानावर असताना दक्षिण आफ्रिकेसाठी हे लक्ष्य अवघड नव्हते. मात्र या षटकातील गोलंदाज हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने लाँग ऑफवर हवेत चेंडू टोलवला आणि कोट्यवधी भारतीयांचा श्वास श्वासात अडकला. लाँग ऑफवर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या सूर्यकुमारने हवेत उडी मारत झेल पकडला आणि मिलर 21 धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमारने सीमारेषेच्या खूपच नजीक झेललेला हा चेंडू सामन्याचा टर्निंग पाँईट तर ठरलाच, शिवाय भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलही ठरला.

3 comments

  1. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/sk/register?ref=OMM3XK51

  2. Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  3. Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version