Breaking News

जय हो! भारतीय मुली Womens Kabaddi World Cup 2025 च्या फायनलमध्ये

womens kabaddi world cup 2025
Photo Courtesy: X

India Into Womens Kabaddi World Cup 2025 Final: बांगलादेश येथील ढाका येथे सुरू असलेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने (India Womens Kabaddi Team) आपले विजयी अभियान कायम राखले आहे. रविवारी (23 नोव्हेंबर) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणला 33-21 असे पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. 

India Into Womens Kabaddi World Cup 2025 Final

साखळी फेरीत एकही सामना न गमावता भारतीय संघ उपांत्य फेरी दाखल झाला होता. तुलनेने बरोबरीच्या असलेल्या इराणविरूद्ध भारतीय संघाला झुंज मिळाली. मात्र, भारताने आक्रमणाचा वेग वाढवत सामना 33-21 असा खिशात घातला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात चायनीज तैपईने यजमान बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सोमवारी उभय संघांमध्ये अंतिम सामना केली. भारत स्पर्धेचा गतविजेता असून, दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: दोन तास शिल्लक असतानाच Smriti Mandhana चा विवाहसोहळा पुढे ढकलला, कारण धक्कादायक

 

Exit mobile version