Breaking News

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : धोनी-साक्षीच्या लूकने वेधले लक्ष, पांड्यानेही कुटुंबासोबत लावली हजेरी

Indian Cricketers at Anant Ambani-Radhika Merchant Wedding :- शुक्रवार (12 जुलै) सकाळपासूनच मुंबईत जल्लोष सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज संध्याकाळी लग्न (Anant-Radhika Wedding) करणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक स्टार्संनी गर्दी केली. भारतीय क्रिकेटपटूंनीही आपल्या उपस्थितीने या लग्नसोहळ्याला चार चाँद लावले. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीही त्याच्या कुटुंबासोबत दिसला. यावेळी धोनी आणि पत्नी साक्षी धोनीने त्यांच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. याआधी धोनी आपल्या कुटुंबासोबत अंबांनींच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये दिसला होता.

धोनी कुटुंबाबरोबरच पांड्या कुटुंबीयही अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. हार्दिक पांड्या, भाऊ कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरी व स्टार यष्टीरक्षक इशान किशन एकत्र लग्नसोहळ्यासाठी पोहोचले. यावेळी हार्दिकचा अभिनेत्री अनन्या पांड्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला.

भारताचा धाकड फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हादेखील पत्नी देविशा शेट्टीसोबत लग्नसोहळ्याला आला होता.

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मानेही त्यांच्या उपस्थितीसह अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला चार चाँद लावले.

स्टार भारतीय यष्टीरक्षक केएल राहुल हादेखील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व अभिनेत्री अथिया शेट्टी आणि सासरे सुनिल शेट्टी सहकुटुंब दिसले.

Exit mobile version