Breaking News

Mitchell Starc ने गाजवली 100 वी कसोटी! इतके सारे रेकॉर्ड केले जमीनदोस्त

mitchell starc
Photo Courtesy: X

Mitchell Starc Shines In 100 th Test: वेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्या दरम्यानचा तिसरा कसोटी सामना सबीना पार्क येथे पार पडला. ऑस्ट्रेलियाने 176 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 अशी खिशात घातली. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने तुफानी गोलंदाजी करत अनेक मित्र नोंदवले.

Mitchell Starc Shines In 100 th Test

जमैका येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी 204 धावांचे आव्हान होते. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांचा डाव केवळ 27 धावांमध्ये संपुष्टात आणला. आपल्या शंभराव्या कसोटीमध्ये स्टार्क याने दुसऱ्या डावात 7.2 षटके गोलंदाजी करत केवळ 9 धावा देत सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. संपूर्ण सामन्यात त्याने सात बळी मिळवले.

स्टार्क याने आपल्या पहिल्या 15 चेंडूंमध्ये 5 फलंदाजांना बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात वेगवान पाच बळी घेण्याचा हा विक्रम आहे. याच डावात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळी देखील पूर्ण केले. डेल स्टेननंतर सर्वात कमी चेंडूत 400 बळी घेण्याचा पराक्रम देखील त्याने केला. यासोबतच कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध त्याने पाच बळी देखील टिपण्याची कामगिरी केली.

दिवस-रात्र कसोटीचा विचार केल्यास त्याने 14 कसोटीत 17 च्या सरासरीने 81 बळी मिळवले आहेत. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत 100 कसोटींमध्ये 402 बळी मिळवून, दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान पटकावले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: जड्डूसह बुमराह-सिराजची झुंज अपयशी! थरारक Lords Test जिंकत इंग्लंडची मालिकेत 2-1 आघाडी

Exit mobile version