Breaking News

दक्षिण आफ्रिका पुन्हा गळपटली! न्यूझीलंडचा दणक्यात Champions Trophy 2025 फायनलमध्ये प्रवेश

CHAMPIONS TROPHY 2025
Photo Courtesy: X

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका (NZ v SA) आमनेसामने आले. लाहोर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने 50 धावांनी एकतर्फी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (9 मार्च) दुबई येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND v NZ) असा अंतिम सामना होईल.

Newzealand Into Champions Trophy 2025 Final

लाहोर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने सलामीवीर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) व केन विल्यमसन (Kane Williamson) यांच्या शतकांच्या जोरावर स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम 362 अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजीत कर्णधार मिचेल सॅंटनर याने तीन महत्त्वपूर्ण बळी घेत, दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानातील हवा काढून टाकली. अनुभवी डेव्हिड मिलर याने दक्षिण आफ्रिकेसाठी नाबाद शतकी खेळी केली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पहिला उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. आता रविवारी दुबई येथे भारत व न्यूझीलंड अंतिम सामना खेळतील. दोन्ही संघांमध्ये झालेल्या साखळी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर 2000 मध्ये झालेल्या याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करत विजेते पद पटकावले होते.

(Newzealand Into Champions Trophy 2025 Final)

बिग ब्रेकिंग! Steve Smith ची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी,

Exit mobile version