Breaking News

World Wrestling Championship 2025 मधून भारत रिकाम्या हाताने परत, तीन वर्षांचा दुष्काळ सुरूच

world wrestling championship 2025
Photo Courtesy: X

World Wrestling Championship 2025: क्रोएशिया येथील झागरेब या ठिकाणी सुरू असलेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंच्या हाती अपयश लागले आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंना एकही पदक जिंकता आले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी भारताचा पदकांचा दुष्काळ कायम राहिला. 

No Medal For India In World Wrestling Championship 2025

यावेळी भारताचे 30 कुस्तीपटूंचे मोठे पथक जागतिक स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात प्रत्येकी दहा पुरुष व दहा महिला प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र, यापैकी कोणीही पदक जिंकू शकले नाही. विशेष म्हणजे भारताचा एकही कुस्तीपटू उपांत्य फेरीत देखील पोहोचण्यात अपयशी ठरला. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता अमन सेहरावत व ऑलिम्पियन दीपक पुनिया यांचा देखील समावेश होता. तर, महिला गटात अंतिम पंघल व प्रिया मलिक समाविष्ट होत्या. ग्रीको रोमन प्रकारात भारताला पदकाच्या अंधुक आशा असतील.

वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमधून भारतीय संघ सलग तिसऱ्या वर्षी विना पदक मायदेशी परतला आहे. भारतासाठी अखेरच्या वेळी 2022 मध्ये बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ही अपयशाची मालिका सुरूच आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा

Exit mobile version