Breaking News

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Nikhat Zareen ठरणार डार्क हॉर्स? बॉक्सिंच्या दुसऱ्या मेडलची आस

nikhat zareen
Photo Courtesy: X

Nikhat Zareen In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. क्रीडा कॅफेच्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पुढील दावेदार आहे महिला बॉक्सर निखत झरीन (Nikhat Zareen). पाहुया तिची आजवरची यशस्वी कारकीर्द.

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Nikhat Zareen)

पॅरिस ऑलिंपिकमध्ये संपूर्ण भारताला ज्या खेळाकडून चांगल्या अपेक्षा आहेत तो खेळ आहे बॉक्सिंग. खासकरून महिला बॉक्सर भारतात एकाहून अधिक पदके आणतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. मागील टोकियो ऑलिंपिक्समध्ये लवलिना बोर्गोहेन हिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ब्रॉंझ मेडल आणण्याची लक्षणीय कामगिरी केली होती. यंदा तशीच किंबहुना त्यापेक्षा गोल्ड किंवा सिल्वर आणण्याची जबाबदारी निखत झरीन (Nikhat Zareen) हिच्यावर असणार आहे.

निखत झरीन ही तेलंगणाच्या निझामाबादची लहानपणापासूनच अंगकाठीने मजबूत असलेल्या निखतला तिच्या वडिलांनी बॉक्सिंगची बाराखडी शिकवली. तिचे वडील मोहम्मद जमील अहमद हे देखील काही काळ बॉक्सिंग खेळले होते. त्याचा फायदा तिला झाला. पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी विझाग येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरमध्ये तिने सरावाला सुरुवात केली.

हे देखील वाचा- Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

निखतने 2011 मध्ये युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे गोल्ड मेडल जिंकले. 2014 ला ज्युनियर गटातून ती दोन स्पर्धांमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनली‌. पुढे 2016 मध्ये ती सीनियर स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. पहिल्याच वर्षी तिने भारतात राष्ट्रीय विजेती होण्याचा मान मिळवला.

निखतला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती म्हणजे 2022 मध्ये. मे महिन्यात तिने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा कारनामा केला. अशी कामगिरी करणारी ती केवळ पाचवी भारतीय महिला होती. तर अवघ्या तीन महिन्यांनी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्येही गोल्ड मेडल भारताच्या खात्यात टाकण्यात तिने कसर सोडली नाही. पुढे एशियन गेम्समध्ये मात्र तिला ब्रॉंझवर समाधान मानावे लागले. तरीदेखील कारकीर्दीच्या दृष्टीने 2022 हे वर्ष तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरले.

दुखापतींपासून निखत नेहमीच दूर राहिली आहे. 2023 मध्ये याच फिटनेसमुळे तिने आपला वर्ल्ड चॅम्पियनशिपचा ताज कायम राखला. यासोबतच वर्ल्ड नंबर वन देखील बनली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पॅरिस ऑलिंपिकमध्ये निखत 50 किलो वजनी गटात म्हणजेच फ्लायवेट प्रकारात आपले आव्हान सादर करेल. मेरी‌ कॉम आणि  लवलिना बोर्गोहेन यांनी ब्रॉंझ देशाच्या पदरात टाकले होते. यंदा पॅरिसमध्ये निखत गोल्डन पंच लगावेल अशी तमाम भारतीयांना खात्री आहे.

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Boxer Nikhat Zareen)

अधिकचे वाचा-

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची

 Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| हॉकीला पुन्हा येणार ‘सोन्या’चे दिवस, वाचा भारतीय हॉकीचा गौरवशाली इतिहास

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Satwik-Chirag कडून मेडलची गॅरंटी? बॅडमिंटन विश्वात त्यांचीच चर्चा

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड

Exit mobile version