Breaking News

सात्विक-चिरागचा विजयरथ सुसाट! थायलंड ओपन जिंकत ठोकली Paris Olympic साठी दावेदारी

भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty) यांनी थायलंड ओपनच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदामुळे भारताच्या पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympic) स्पर्धेतील पदकाच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जोडी सातत्याने जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा राखून आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या या जोडीसमोर अंतिम सामन्यात चीनच्या जोडीचे आव्हान होते. आपला अनुभव व फॉर्म याच्या जोरावर भारतीय जोडीने चेन बो यांग व लियु यी या जोडीला 21-15, 21-15 असे सहज पराभूत करत नववे बीडब्लूएफ विजेतेपद आपल्या नावे केले.

या विजेतेपदानंतर बोलताना चिराग म्हणाला,

“येथे खेळणे नेहमीच आनंददायी असते. आम्ही 2019 मध्ये पहिल्यांदा सुपर कप इथेच जिंकलो होतो. तर थॉमस कपचा विजय येथे साकार झालेला.”

मागील काही स्पर्धांमध्ये या भारतीय जोडीला फारसे मिळाले नव्हते. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत त्यांना धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागलेले. तर सात्विच्या दुखापतीमुळे ते आशियाई चॅम्पियनशिप खेळू शकले नव्हते. तसेच थॉमस कप स्पर्धेतही भारतीय दलाला अपयश आले होते. त्यामुळे हा विजय मिळवल्याने भारतीय जोडीकडे आता आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत पदकाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

(Satwiksairaj And Chirag Shetty Won Thailand Open Medal Hopes For Paris Olympic)

 

 

5 comments

  1. A person essentially help to make seriously articles I’d state. That is the very first time I frequented your website page and thus far? I amazed with the analysis you made to make this particular post amazing. Great activity!

  2. Some truly wonderful info , Gladiolus I found this.

  3. certainly like your website however you have to take a look at the spelling on several of your posts. Several of them are rife with spelling problems and I find it very troublesome to tell the truth on the other hand I’ll surely come back again.

  4. Heya i am for the primary time here. I came across this board and I to find It really helpful & it helped me out much. I am hoping to offer one thing back and help others such as you aided me.

  5. You could definjitely see your skills in the article you
    write. The sector hopes ffor even more passionate writers such as
    youu who aren’t afraid to menion how they believe. At alll times follow your heart. https://Menbehealth.Wordpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version