Breaking News

Pakistan Cricket Team: पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचे कारण आले समोर, टीममध्ये पडलेत दोन गट?

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी टी20 विश्वचषक 2024 (T20 World up 2024) वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. पाकिस्तान संघाला (Pakistan Cricket Team) अमेरिकेसारख्या संघाविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले. आयर्लंडविरुद्धही पाकिस्तानला विजय मिळवण्यात भरपूर संघर्ष करावा लागला. एकीकडे पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर टीका होत असताना दुसरीकडे संघाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान संघ दोन गटात विभागला गेला असल्याचे म्हटले जात आहे.

टी20 विश्वचषकाचा चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवून यानंतर शाहीन आफ्रिदीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, पीसीबीने टी20 विश्वचषक सुरु होण्याच्या अगदी थोड्या दिवसांआधी पुन्हा नेतृत्व बाबरकडे वळवले. परिणामी बाबर आणि शाहीनमध्ये मोठा वाद सुरु असून हे दोघे एकमेकांशी बोलत नाहीत, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही पाकिस्तान क्रिकेट संघात सुरू असलेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली होती. हिंदुस्तान टाईम्समधील एका बातमीनुसार अक्रम म्हणाला, “संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांना एकमेकांशी बोलायचेही नाही, तुम्ही देशासाठी खेळत आहात.” अक्रमने त्याच्या बोलण्यातून बाबर आणि शाहीनला टोला लगावला असल्याचे म्हटले जात आहे.

2 comments

  1. I cherished up to you’ll receive carried out right here. The sketch is attractive, your authored subject matter stylish. nonetheless, you command get bought an edginess over that you would like be handing over the following. unwell indubitably come further in the past once more as precisely the same nearly very ceaselessly inside of case you protect this increase.

  2. After research a couple of of the blog posts on your web site now, and I truly like your means of blogging. I bookmarked it to my bookmark website list and can be checking again soon. Pls try my web page as effectively and let me know what you think.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version