Breaking News

Shreyas Iyer बनला पंजाबचा 17 वा कर्णधार, वाचा संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

shreyas iyer
Photo Courtesy: X/Shreyas Iyer

Shreyas Iyer Appointed As Punjab Kings Captain: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसच्या सेटवरून ही घोषणा करण्यात आली. भारताचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा आगामी हंगामात पंजाबचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व करणारा तो 17 वा कर्णधार असेल. 

Shreyas Iyer Appointed As Punjab Kings Captain

बिग बॉसच्या सेटवरून होस्ट अभिनेता सलमान खान याने श्रेयसच्या नावाची कर्णधार म्हणून घोषणा केली. तसेच त्याला पंजाबची जर्सी भेट दिली. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रेयस म्हणाला, “पंजाब संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. पंजाबला पहिली ट्रॉफी जिंकून देण्याचा आमचा मानस आहे.” यावेळी संघाचे सदस्य असलेले युझवेंद्र चहल व शशांक सिंग हे देखील उपस्थित होते.

आयपीएल 2025 लिलावात पंजाबने श्रेयसवर 26.75 कोटी इतकी मोठी बोली लावली होती. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस याच्याच नेतृत्वात आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावलेले. मात्र, त्यांनी त्याला रिटेन न केल्याने तो लिलावात सहभागी झालेला. कर्णधार म्हणून श्रेयसची आयपीएलमधील कामगिरी दमदार असून, त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये अंतिम फेरी पर्यंतचा प्रवास केला होता. तसेच, त्याच्या नेतृत्वात नुकतेच मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

पंजाब किंग्सचे आतापर्यंतचे कर्णधार- युवराज सिंग, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, ऍडम गिलख्रिस्ट, डेव्हिड हसी, जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, रवीचंद्रन अश्विन, केएल राहुल, मयंक अगरवाल, शिखर धवन, सॅम करन, जितेश शर्मा व श्रेयस अय्यर

(Shreyas Iyer Appointed As Punjab Kings Captain For IPL 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

 

Exit mobile version