
INDvSA Kolkata Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या फ्रीडम ट्रॉफी 2025 (Freedom Trophy 2025) कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी (16 नोव्हेंबर) समाप्त झाला. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले 124 धावांचा यशस्वी बचाव करताना 30 धावांनी ऐतिहासिक विजय संपादन केला. फिरकीपटू सायमन हार्मर (Simon Harmer) दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Spinners script South Africa's first Test win in India since 2010 ⚡#INDvSA 📝: https://t.co/fexthP5RGW pic.twitter.com/Ts9TESNmyE
— ICC (@ICC) November 16, 2025
South Africa Won Kolkata Test Against India
फिरकीला मदतगार असणाऱ्या या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 159 धावांवर समाप्त झालेला. पहिल्या डावात भारतासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक पाच बळी मिळवलेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय डाव देखील दक्षिण आफ्रिकेचा डाव दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंमुळे 189 च्या पुढे जाऊ शकला नाही. त्यात भारतीय कर्णधार शुबमन गिल हा दुखापतीमुळे संपूर्ण सामन्यातून बाहेर झाला. भारतीय संघाला पहिल्या डावात 30 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फारसे आव्हान देऊ शकले नाहीत. मात्र, कर्णधार टेंबा बवुमा याने एक बाजू लावून धरत शानदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 153 पर्यंत पोहोचला. या धावांचा बचाव करताना सायमन हार्मर याने पहिल्या डावाप्रमाणे तो दुसऱ्या डावातही चार बळी टिपले. केशव महाराज याने अखेरचे दोन गडी बाद करत भारताचा डाव 93 धावांवर संपवला. यासह दक्षिण आफ्रिका संघाने 30 धावांनी विजय संपादन केला.
दक्षिण आफ्रिका संघाने 2010 नंतर प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला आहे. तर, टेंबा बवुमा याने आपल्या कारकीर्दीत कर्णधार म्हणून अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: IPL 2026 Retention: आयपीएल 19 साठी रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।