Breaking News

पुण्याच्या Vaishnavi Adkar चे जर्मनीत ऐतिहासिक यश! 46 वर्षांनंतर जिंकून आणले मेडल

vaishnavi adkar
Photo Courtesy; X

Vaishnavi Adkar Won Bronze In Germany: पुण्याची उदयोन्मुख टेनिसपटू वैष्णवी आडकर हिने जर्मनी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स (World University Games) मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलींच्या एकेरी प्रकारात तिने कांस्य पदक जिंकले. अशी कामगिरी करणारे ती पहिली भारतीय महिला तर केवळ दुसरी भारतीय टेनिसपटू बनली.

Vaishnavi Adkar Won Bronze In World University Games

जर्मनीच्या राईन-रूहर येथे होत असलेल्या या स्पर्धेत तिने वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय संघासाठी खेळताना हे पदक आपल्या नावे केले. यापूर्वी 1979 मध्ये पुण्याच्याच नंदन बाळ (Nandan Bal) यांनी मेक्सिको येथे झालेल्या स्पर्धेत भारतासाठी अखेरचे पदक जिंकलेले. बाळ यांनी देखील तिच्या या कामगिरीनंतर तिचे कौतुक केले.

वैष्णवी हिने चालू वर्षी जगातील अव्वल 300 महिला टेनिसपटूंमध्ये येण्याचे लक्ष ठेवले आहे. आपल्या या कामगिरीचे श्रेय तिने वडील निहार आडकर व प्रशिक्षक नंदन बाळ यांना दिले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: तब्बल 4 बदलांसह इंग्लंड खेळणार Oval Test, भारताकडे मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी

Exit mobile version