Breaking News

कोण आहे पदार्पणातच विराट-बुमराहला नडणारा Sam Konstas? खडूस ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या तालमीत झालाय तयार

sam konstas and virat
Photo Courtesy: X

Sam Konstas Test Debute: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी फलंदाजीत 300 पेक्षा जास्त धावा काढल्या. या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारा सलामीवीर सॅम कॉनस्टास (Sam Konstas Test Debute) हा चांगलाच चर्चेत आला आहे.

Who Is Sam Konstas

मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीत केवळ 19 वर्ष 85 दिवस वय असलेल्या कॉनस्टास याने पदार्पण केले. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण करणारा तो चौथा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने अतिशय आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराह याला त्याने दोन षटकार मारत, आपली कुवत दाखवून दिली. त्याने 65 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी केली.

आपल्या या खेळी दरम्यान भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Sam Konstas And Virat Kohli) व मोहम्मद सिराज यांच्याशी त्याने थेट पंगा घेतला. विराटने त्याला धक्का दिल्यानंतर त्याने देखील तशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले. तर, सिराज याच्या स्लेजिंगला देखील तो उत्तर देताना दिसला. त्याच्या या निर्भीड स्वभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

कॉनस्टास हा आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत केवळ 11 प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. यादरम्यान त्याची सरासरी 40 पेक्षा जास्त राहिली. भारतीय संघाविरुद्ध प्राईम मिनिस्टर इलेव्हनकडून खेळताना त्याने 110 धावांची खेळी केली होती. नॅथन मॅकस्विनी पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया संघ सामील केले गेले. कॉनस्टास हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन याच्या मार्गदर्शनाखाली खेळतो. वॉटसन त्याचा मेंटर आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

पहिल्या डावातील खेळीनंतर त्याने बोलताना म्हटले की, “मैदानावर काहीही घडलं तरी, तिथेच थांबायचे असते. तसेच पुढे जाऊन बुमराह याला अशाच पद्धतीने खेळण्याचा माझा प्रयत्न असेल.” विशेष म्हणजे ज्या विराट कोहलीशी त्याचा वाद झाला, त्या विराटला तो आपला आवडता क्रिकेटपटू म्हणतो.

(Who Is Debutant Sam Konstas)

बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?

Exit mobile version