Breaking News

French Open 2024 चा ड्रॉ जाहीर, नदाल-मरेची पहिल्याच राउंडमध्ये परीक्षा, सुमित नागलला…

FRENCH OPEN 2024
Photo Courtesy: X/US Open

French Open 2024 Draw|वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला आहे. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) या मातीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत, अनेक दिग्गज आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंसमोर पहिल्याच फेरीत अवघड प्रतिस्पर्धी उभे ठाकले आहेत. तब्बल 14 फ्रेंच ओपन जिंकणारा स्पेनचा माजी अग्रमानांकित टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याच्यासमोर पहिल्या फेरीतच विजेतेपदाचा दावेदार मानला जात असलेल्या जर्मनीच्या ऍलेक्झांडर झेरेव (Alexander Zverev) याचे आव्हान आहे.

आपला अखेरचा हंगाम खेळत असलेल्या नदाल याच्यासाठी हा पहिला सामना अत्यंत मुश्किलीचा ठरणार आहे. मागील आठवड्यातच इटालियन ओपन जिंकणारा झेरेव या सामन्यात विजय मिळवेल असे जाणकार म्हणत आहेत. असे झाल्यास क्ले कोर्टचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदाल याची फ्रेंच ओपनमधील अखेर निराशाजनक ठरेल.

दुसरीकडे 2017 नंतर प्रथमच ब्रिटनचा ऍंडी मरे (Andy Murray) फ्रेंच ओपन खेळताना दिसेल. त्याच्यासमोर स्टॅन वांवरिका याचे तगडे आव्हान असणार आहे. तर अग्रमानांकित नोवाक जोकोविच हा पहिल्या फेरीत इटलीच्या हर्बर्ट पिएरे याच्या विरोधात खेळेल. या स्पर्धेत खेळत असलेला भारताचा एकमेव टेनिसपटू सुमित नागल 18 व्या मानांकित कॅरन खॅचेनोव याच्या विरोधात खेळेल.

(French Open 2024 Draw Nadal Face Zverev In First Round)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

4 comments

  1. I went over this website and I believe you have a lot of superb information, bookmarked (:.

  2. You have mentioned very interesting points! ps nice site.

  3. Thank you, I have just been looking for info approximately this topic for ages and yours is the greatest I’ve came upon so far. However, what about the bottom line? Are you sure concerning the source?

  4. This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version