Breaking News

बॉलिवूडच्या तडक्याने IPL 2025 ची ग्रॅंड ओपनिंग! ईडन गार्डनवर रंगला झगमगाता सोहळा

ipl 2025
Photo Courtesy: X

IPL 2025 Opening Ceremony: जगातील सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला शनिवारी (22 मार्च) सुरुवात झाली. कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या शानदार उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटींनी चार चांद लावले.

IPL 2025 Opening Ceremony On Eden Gardens

सलग अठराव्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal), अभिनेत्री दिशा पटानी व करन ऑजला यांनी परफॉर्मन्स सादर केले. श्रेया घोषालने सर्व दहा संघांच्या 10 भाषेत गाणे गात अखेर वंदे मातरमने केली.

याच कार्यक्रमात सलग 18 वर्ष एकाच संघासाठी खेळत असलेल्या विराट कोहली याचा सन्मान करण्यात आला. यावेळी विराट याने शाहरुख खान याच्यासह पठाण गाण्यावर नृत्य केले. तसेच, केकेआरचा युवा खेळाडू रिंकू सिंग याने देखील परफॉर्मन्स सादर केला. आयपीएलच्या अठराव्या वर्षानिमित्त बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते खास केक कापण्यात आला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पहिला सामन्यात समोरासमोर आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKRvRCB) यांच्यातील नाणेफेक आरसीबी संघाने जिंकली. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

(IPL 2025 Grand Opening On Eden Gardens)

हे देखील वाचा- IPL Archives: ललित मोदींनी लावलेलं आयपीएल नावाचं रोपट 18 वर्षांचं झालंय

IPL 2025 च्या ‘यंगगन्स’! ज्या यावर्षी नक्कीच धडाडणार, भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणार

Exit mobile version