Breaking News

सोमवारपासून पहिल्या Kho-Kho World Cup चा थरार! टीम इंडियाची मदार महाराष्ट्राच्या खांद्यावर

KHO-KHO WORLD CUP
Photo Courtesy: X

Kho-Kho World Cup 2025: संपूर्ण क्रीडाविश्व पहिल्या खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup) विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. दिल्ली येथे 13 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान या विश्वचषकाचा थरार रंगेल. जगभरातील पुरुष व महिला यांचे मिळून तब्बल 39 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताच्या दोन्ही संघाचे नेतृत्व महाराष्ट्रातील खेळाडू करतील.

Kho-Kho World Cup Starts From 13 January

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपयांची विशेष मदत दिली आहे. महाराष्ट्र हा खो-खो खेळाचा गड मानला जातो. भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही संघांचे कर्णधार व बहुतांशी खेळाडू महाराष्ट्रातीलच आहेत. या विश्वचषकानंतर खो-खोला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळू शकते.

आठवडाभर चालणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, स्टार स्पोर्ट्स व स्पोर्ट्स 18 करतील. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी हॉटस्टारवर होईल. पुरुष गटातील सलामीचा सामना 13 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता यजमान भारत व नेपाळ यांच्या दरम्यान खेळला जाईल. तर, महिला गटातील भारतीय संघाचा पहिला सामना भारत व दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान 14 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा प्रतिक वायकर (Pratiksha Waikar) करेल. तर, महिलांच्या संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचीच प्रियांका इंगळे (Priyanka Ingle) ही करणार आहे.

भारत पुरूष संघ: प्रतिक वायकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिव पोथिर रेड्डी, आदित्य गणपुले, गौतम एम के, निखील बी, आकाश कुमार, सुब्रमणी व्ही, सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस रोकशन सिंग.

भारत महिला संघ: प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई मांझी, अंशू कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू मोनिका, नाझिया.

(First Kho-Kho World Cup Starts From 13 January)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?

पाहा BGT 2024-2025 मधील टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड! कोणी नापास, कोणी काठावर तर कोणी मेरिटमध्ये पास

Exit mobile version