
IPL 2026 At MCA International Cricket Stadium Pune: पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल 2026 आधी एक आनंदाची बातमी समोर येतेय. पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आगामी आयपीएल हंगामातील सामने होण्याची शक्यता वाढली आहे. दोन आयपीएल फ्रॅंचाईजींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला असून, एमसीए अखेरचा निर्णय लवकरच जाहीर करेल.
MCA International Cricket Stadium Pune Surely Host IPL 2026
काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आपले होम ग्राउंड म्हणून गहुंजेला निवडणार असल्याचे वृत्तसमोर आले होते. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठा गर्दीचे सामने खेळण्यास महानगरपालिकेने बंदी घातल्यानंतर, आरसीबी (RCB) नव्या होम ग्राऊंडचा शोध घेत आहे. आयपीएल लिलावानंतर ते आपला अंतिम निर्णय कळवणार असल्याचे, एमसीए पदाधिकाऱ्याने स्पष्ट केलेले.
त्यानंतर आता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ने गहुंजेला आपले होम ग्राउंड बनवण्याची चाचणी सुरू केली असून, एमसीएशी संपर्क साधला आहे. तसेच, पुण्यातील हॉटेल व सराव मैदानांची दुसरी चौकशी केल्याचे स्पष्ट झाले. राजस्थान रॉयल्सने एमसीएला अधिकृत ई-मेल केला असून, एमसीए आरसीबीच्या निर्णयानंतर राजस्थानला आपला निर्णय कळवेल. त्यामुळे पुण्यात आयपीएल 2026 चे सामने होण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येतेय.
मागील वर्षी राजस्थान रॉयल्स व राजस्थान क्रिकेट संघटना यांच्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राजस्थान रॉयल्स आपला बेस बाहेर हलवण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास ते पुण्यात चार तर गुवाहाटीत तीन सामने खेळू शकतात.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: न्याय मिळाला! Ruturaj Gaikwad ची वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड, कर्णधारही बदलला