Breaking News

रोहित शर्मा आणि संघाचं T20 World Cup Final गाठणं 100 टक्के निश्चित! ‘बॅड लक’ झालंय दूर

IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 world Cup 2024) उपांत्य फेरीकडे आहेत. 27 जूनला गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अंतिम सामना गाठण्यासाठी दुसऱ्या उपांत्य सामन्याचा थरार होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 

भारतासाठी आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरी सामन्यांमध्ये नेहमी ‘कर्दनकाळ’ ठरलेले पंच रिचर्ड केटलबर्ग यांना आयसीसीने पंच म्हणून निवडलेले नाही. आयसीसीने उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांसाठी पंचांची (Umpires For Semifinal) घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदानावरील पंच न्यूझीलंडचा ख्रिस गॅफनी आणि ऑस्ट्रेलियाचा रॉडनी टकर हेयांची निवड करण्यात आली आहे. या सामन्यात जोएल विल्सन टीव्ही पंच असतील, तर पॉल रीफेल चौथे पंच असतील. न्यूझीलंडचे जेफ्री क्रो सामनाधिकारीची भूमिका निभावतील.

नितीन मेनन हेही पंचगिरी करणार आहेत
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि भारताचे नितीन मेनन हे मैदानी पंच म्हणून काम पाहतील. रिचर्ड केटलबोरो हे टीव्ही पंच, तर एहसान रझा हे चौथे पंच असतील. या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून वेस्ट इंडिजच्या रिची रिचर्डसनची नियुक्ती करण्यात आली आहे.

6 comments

  1. I love the efforts you have put in this, thankyou for all the great content.

  2. Hi my friend! I want to say that this post is amazing, nice written and include almost all significant infos. I’d like to see more posts like this.

  3. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  4. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  5. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  6. I was examining some of your articles on this internet site and I believe this website is very instructive! Continue putting up.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version