Breaking News

U19 Asia Cup 2025 साठी भारतीय संघ घोषित! मुंबईकर बनला कर्णधार तर…

u19 asia cup 2025
Photo Courtesy: X

U19 Asia Cup 2025 India Squad: दुबई येथे 12 डिसेंबरपासून होणाऱ्या अंडर 19 एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय मुलांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) हा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तर, नुकताच एशिया कप रायझिंग स्टार्स ही स्पर्धा गाजवून आलेला वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा भारतीय संघाचा भाग असेल. आगामी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.

या भारतीय संघात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय याची निवड होऊ शकली नाही. तर, किशन कुमार सिंग हा दुखापतग्रस्त असताना देखील त्याची संघात निवड करण्यात आली आहे. भारत या गटात पाकिस्तान व पात्रता फेरीतून पुढे येणाऱ्या दोन संघाविरुद्ध खेळेल. दुबई येथे 12 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 21 डिसेंबर रोजी होईल.

India Squad For U19 Asia Cup 2025

अंडर 19 एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ: आयुष म्हात्रे, विहान मल्होत्रा, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू, हरवंश सिंग, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलान पटेल, नमन पुष्पक, डी. दीपक, हेनिल पटेल, किशन कुमार सिंग, ऍरॉन जॉर्ज व उद्धव मोहन.

राखीव खेळाडू: राहुल कुमार, हूमचुदेशन जे, बीके किशोर व आदित्य रावत

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ही दोस्ती तुटायची नाय! Virat Kohli-MS Dhoni चे रियुनियन, पाहा व्हिडिओ

Exit mobile version