Breaking News

आजपासून Womens Cricket World Cup 2025 ची रणधुमाळी! भारतही दावेदार, बक्षिसांची होणार खैरात

womens cricket world cup 2025
Photo Courtesy: X

ICC Womens Cricket World Cup 2025: मंगळवारी (30 सप्टेंबर) तेराव्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारत व श्रीलंका संयुक्तरीत्या या स्पर्धेचे यजमानपद भूषवतील. स्पर्धेत यावेळी एकूण आठ संघ सहभागी होत असून, यजमान भारतासह ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जातात.

ICC Womens Cricket World Cup 2025 Starts Today

बारा वर्षानंतर वनडे विश्वचषक भारतात खेळला जाईल. यजमान भारतासोबत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश हे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलिया इंग्लंड व न्यूझीलंड यांनाच वनडे विश्वचषक जिंकण्यात यश आले आहे. मात्र, यावेळी यजमान भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय.

या स्पर्धेचे यजमानपद भारत एकटाच भूषवणार होता. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पाकिस्तान संघ आपले सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळेल. तर, भारतातील गुवाहाटी, विशाखापट्टणम, नवी मुंबई व इंदोर या ठिकाणी सामने होणार आहेत.

स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना यजमान भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान गुवाहाटी येथे खेळला जाईल. भारतीय संघाची मदार प्रामुख्याने कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) व क्रांती गौड यांच्यावर असेल. या तीनही खेळाडूंची कामगिरी नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार राहिलेली. कट्टर प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान पुढील रविवारी (5 ऑक्टोबर) कोलंबो येथे सामना होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल 40 कोटींची घसघशीत रक्कम मिळेल. उपविजेत्या संघाला 20 कोटी आणि उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांना प्रत्येकी दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संघाला 6.16 कोटी व अखेरच्या दोन स्थानावरील संघांना 2.50 कोटी रुपये देण्यात येतील. सहभाग शुल्क म्हणून देखील प्रत्येक संघाला 2.20 कोटी रुपये वेगळे देण्यात येणार आहेत. (Prize Money In Womens Cricket World Cup 2025)

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आंतरराष्ट्रीय पटलावर Nepal Cricket चा सूर्योदय! विंडीजला लोळवत घडवला इतिहास

Exit mobile version