Breaking News

अवघ्या 15 बॉलमध्ये रातोरात स्टार बनला Vipraj Nigam! रिंकू सिंगचा खास जोडीदार आणि बरच काही

VIPRAJ NIGAM
Photo Courtesy: X

Vipraj Nigam Story: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये चौथा सामना चांगलाच थरारक झाला. दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या षटकात 210 धावांचे लक्ष अवघा एक गडी राखून पूर्ण केले. आशुतोष शर्मा याने तुफानी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, त्यांच्या विजयाचा आणखी एक शिल्पकार होता युवा अष्टपैलू विपराज निगम (Vipraj Nigam). हा विपराज नक्की आहे तरी कोण?

DC All Rounder Vipraj Nigam Story

सुरुवातीला आपण आयपीएल पदार्पण करताना विपराजने काय कामगिरी केली हे जाणून घेऊ. लेगस्पिनर म्हणून पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने एडन मार्करम याचा बळी मिळवत, दिल्लीला पहिले यश कमावून दिलेले. मात्र, दुसऱ्या षटकात तो चांगलाच महागडा ठरला. त्याच्या दोन षटकार तब्बल 35 धावा कुटल्या गेल्या. गोलंदाजीतील पदार्पण त्याचे म्हणावे तसे झाले नाही. मात्र, फलंदाजीत त्याने त्याची कसर भरून काढली.

ट्रिस्टन स्टब्स याच्या रूपाने दिल्लीला सहावा धक्का बसला होता. त्यावेळी दिल्लीची धावसंख्या 113 होती. दिल्लीला विजयासाठी आणखी 97 धावा हव्या होत्या. त्यावेळी विपराजने कोणतेही दडपण न घेता थेट चौकार-षटकारांची बरसात सुरू केली. त्याने आशुतोष शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करताना, दिल्लीला सामन्यात आणले. बाद होण्यापूर्वी त्याने केवळ 15 चेंडू पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. गोलंदाज म्हणून संघात सामील झालेल्या विपराजची अशी फटकेबाजी पाहून, सगळेच अवाक् झाले.

विपराज हा उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. युपी टी20 लीगमध्ये रिंकू सिंग सोबत लखनऊ फाल्कन संघात खेळताना त्याने आपल्या संघाला अनेक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले होते. तो प्रामुख्याने लेगस्पिनर म्हणूनच संघात समाविष्ट असतो. त्या स्पर्धेत त्याने 11 सामन्यात 20 बळी मिळवले होते. गोलंदाज असला तरी संधी मिळाल्यावर बॅट चालवण्याची संधी तो घालवत नाही. विपराज अनेक संघांच्या नजरेत मुश्ताक अली ट्रॉफी 2024-2025 दरम्यान आलेला. संपूर्ण स्पर्धेत त्याने आठ बळी घेताना इकॉनॉमी रेट अवघ्या सातचा ठेवला होता. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी देखील त्याची निवड झाली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

या स्पर्धेदरम्यान उत्तर प्रदेशला आंध्रप्रदेशविरुद्ध डू ऑर डाय सामन्यात विजय करून देताना त्याने केवळ 8 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी केली होती. आयपीएल 2025 लिलावात त्याची बेस प्राईस 30 लाख होती. त्यावेळी दिल्ली आणि लखनऊ याच संघांनी त्याच्यावर बोली लावलेली. मात्र, अखेर 50 लाखांच्या किमतीत तो दिल्लीकर झालेला. राशिद खान याला आदर्श मानणारा विपराज आयपीएल 2025 अशीच गाजवणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

(DC All Rounder Vipraj Nigam Story)

हे देखील वाचा- कोण आहे मुंबईचा नवा भिडू Vignesh Puthur? फक्त 2 मॅच आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, वाचा पूर्ण स्टोरी

 

Exit mobile version