Breaking News

IPL 2025 Retention चे सर्व नियम आपल्या सोप्या मराठी भाषेत, उदाहरणांसह

IPL 2025 Retention Rules In Marathi: सर्वच क्रिकेट प्रेमींना आतुरता असलेल्या आयपीएल 2025 (IPL 2025) या हंगामासाठीच्या रिटेन्शन नियमांची घोषणा झाली आहे. आयपीएलच्या या पुढील हंगामाच्या लिलावाआधी आयपीएलच्या अधिकृत एक्स हॅंडलवरून हे नवीन नियम जाहीर केले गेले. बेंगलोर येथे झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हे निर्णय अंतिम केले गेले. आयपीएल 2025 ते आयपीएल 2027 या कालावधीसाठी हे नियम असतील.

ipl 2025 retention
Photo Courtesy: X

IPL 2025 Retention

आपण सोप्या मराठी भाषेत हे नियम समजून घेऊया.

नियम क्रमांक 1: प्रत्येक आयपीएल संघ आपल्या आत्ताच्या संघातील जास्तीत जास्त सहा खेळाडू कायम ठेवू शकतो. हे सहा खेळाडू रिटेन करून अथवा मेगा लिलावात राईट टू मॅच कार्ड (आरटीएम कार्ड) वापरून कायम ठेवले जाऊ शकतात.

नियम क्रमांक 2: रिटेन्शन आणि आरटीएम यांचा ताळमेळ बसवणे, हे संघावर अवलंबून असेल. प्रत्येक संघ जास्तीत जास्त पाच कॅप्ड खेळाडू (आंतरराष्ट्रीय खेळाडू) निवडू शकतो. तसेच, जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर असेल. पाच कॅप्ड खेळाडूंपैकी भारतीय व विदेशी खेळाडूंच्या निवडीवर बंधन नसेल. मात्र,एक अनकॅप्ड खेळाडू कायम राखणे बंधनकारक असेल. उदा. मुंबई इंडियन्स पाच भारतीय खेळाडूंना कायम करू शकतो किंवा सनरायझर्स हैदराबाद पाच विदेशी खेळाडू देखील कायम करण्यासाठी पात्र असेल. तथा, राजस्थान रॉयल्स संघ तीन भारतीय आणि दोन विदेशी खेळाडू देखील कायम करू शकतो.

नियम क्रमांक 3: प्रत्येक संघ आयपीएल मेगा लिलावात 120 कोटी इतकी रक्कम घेऊन सहभागी होऊ शकतो. लिलावासाठी वापरण्यात येणारी रक्कम, कामगिरी वेतन व मॅच फीस असे मिळून प्रत्येक संघ 146 कोटी खर्च करू शकतो. आयपीएल 2026 साठी यामध्ये वाढ होऊन ही रक्कम 151 कोटी तर आयपीएल 2027 साठी 157 कोटी होईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

नियम क्रमांक 4: आयपीएलच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंना या हंगामात मॅच फीस देण्यात येईल. एका सामन्याचे प्रत्येक खेळाडूला 7 लाख 50 हजार इतके वेतन मिळेल. ही रक्कम त्याच्या कराराच्या रकमेच्या वेगळी असेल.

नियम क्रमांक 5: कोणत्याही आंतरराष्ट्रीय विदेशी खेळाडूला मेगा लिलावासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी न केलेल्या खेळाडूला पुढील वर्षीच्या लिलावात स्थान मिळणार नाही.

नियम क्रमांक 6: लिलावात विक्री झालेल्या खेळाडूने स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर दुखापती व्यतिरिक्त अचानक इतर कारणाने माघार घेतल्यास, त्या खेळाडूला पुढील दोन वर्षासाठी लिलाव व स्पर्धत सहभागी होण्यास प्रतिबंधित करण्यात येईल.

नियम क्रमांक 7: मागील पाच वर्षांपासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना न‌ खेळलेला (कसोटी, वनडे व टी20) आणि बीसीसीआयच्या केंद्रित करारात नसलेला माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा अनकॅप्ड म्हणून ओळखला जाईल. हा नियम केवळ भारतीय खेळाडूंना लागू होईल. उदा. एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्त झाला आहे. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 मध्ये खेळलेला. या नियमानुसार तो अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन होऊ शकतो किंवा लिलावात सहभागी होऊ शकतो.

नियम क्रमांक 8: इम्पॅक्ट प्लेयर नियम 2025 ते 2027 पर्यंत कायम राहिल.

(IPL 2025 Retention Rules In Marathi)

हे देखील वाचा: IPL 2025 Retention ची ब्रेकिंग न्यूज! इतके खेळाडू ठेवता येणार कायम, वाचा सर्व संघाचे संभाव्य रिटेन्शन

Exit mobile version