Breaking News

Rohit Sharma Controversy : रोहित शर्माने तिरंग्याचा केला अपमान? विश्वविजेता कर्णधार का ठरतोय टीकेचा धनी?

Rohit Sharma Controversy : भारतीय क्रिकेट संघाला 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याचं गुणगान गाताना चाहते थकत नाहीत. रोहितने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तेव्हापासून रोहित सातत्याने कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. विश्वविजयानंतरचे सेलिब्रेशन, मुंबईतील विजयी यात्रा यामुळे रोहित चर्चेचा विषय ठरला. यानंतर आता पुन्हा एकदा रोहितची चर्चा होत असून यासाठी त्याचा नवा सोशल मीडिया प्रोफाइल फोटो कारणीभूत आहे. अनेकांनी नव्या प्रोफाइल फोटोवरुन रोहितने तिरंग्याचा अपमान केला आहे, असे म्हणत टीका केली आहे. 

रोहित शर्माने सोमवारी (08 जुलै) सोशल मीडियावर त्याचा प्रोफाइल फोटो बदलला. फोटोमध्ये रोहित शर्मा बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा फडकवत होता. रोहितचा हा प्रोफाईल फोटो अनेक चाहत्यांना आवडला नाही. रोहितकडून या फोटोत तिरंग्याचा अपमान केला जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कारण तिरंगा ध्वजाने जमिनीला स्पर्श केलेला आहे.

अशा प्रकारे फोटो ठेवणे हा तिरंग्याचा अपमान असल्याचे चाहत्यांनी ट्विट करून रोहित शर्माला सांगितले आहे. एका चाहत्याने लिहिले की, ध्वज संहितेच्या नियमांनुसार तिरंगा ध्वज जमिनीवर स्पर्श करू नये. त्यामुळे तिरंग्याचा अपमान करू नका, असे आवाहन त्या चाहत्याने रोहित शर्माला केले आहे. रोहितने असा प्रकार जर भारतात केला असता तर मोठा गोंधळ होऊ शकला असता, असेही अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तर रोहित शर्माला ध्वजाबद्दलचा हा नियम माहीत आहे का? असाही सवाल काहींनी विचारला आहे.

Exit mobile version