Breaking News

Virat Kohli 27000: विक्रमादित्य विराट! 27 हजारी मनसबदार बनत रोवत शिरपेचात मानाचा तुरा

VIRAT KOHLI 27000
Photo Courtesy: X

Virat Kohli 27000 Runs In International Runs: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान कानपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेगवान फलंदाजी केली. अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या खेळी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा (Virat Kohli 27000 Runs In International Cricket) पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आणि चौथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला.

पहिल्या सामन्यात अपयश आल्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीलाच मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेताना त्याने धावगती वाढवली. यादरम्यान त्याने 27000 धावा पूर्ण केल्या. त्याच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये 13906 व टी20 क्रिकेटमध्ये 4188 धावा जमा आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये तो 9000 धावांच्या जवळ आहे. विराटने केवळ 594 डावांमध्ये ही कामगिरी करून, सर्वात जलद टप्पा गाठण्याचा पराक्रम केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर यांच्या नावे सर्वाधिक 34,357 धावा आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा याने 28016 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोंदवलेल्या. तिसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याच्या नावे 27483 धावा जमा आहेत. विराट लवकरच या यादीत दुसऱ्या स्थानी येऊ शकतो.

(Virat Kohli 27000 Runs In International Cricket)

 देखील वाचा: IND v BAN: टेस्टमध्ये रोहितची टी10 स्टाईल धुलाई! तीनच षटकात रचला विश्वविक्रम, व्हिडिओ पाहा

Exit mobile version