Breaking News

INDvPAK | भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात होणार मोठे बदल! ‘या’ खेळाडूंचा कटू शकतो पत्ता

INDVPAK
Photo Courtesy: X/ICC

INDvPAK :- आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर भारताचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. रविवारी (०९ जून) न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर झालेल्या टी२० विश्वचषक सामन्यातही भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) ६ धावांनी पराभव केला. यासह टी२० विश्वचषकात ८ सामन्यांनंतर निकाल ७-१ असा आहे. म्हणजे पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतप्त असतानाच, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कारवाईच्या मूडमध्ये आहे. पुढील सामन्यात पाकिस्तान संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पीसीबीने पाकिस्तानी संघावर लवकरच मोठी ‘शस्त्रक्रिया’ करावी लागेल, असे म्हटले आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले की, “भारताकडून हरल्याचे आम्हाला दुःख आहे. हा सामना पाकिस्तानने जिंकायला हवा होता. पाकिस्तानी संघावरील किरकोळ शस्त्रक्रियेने काम होईल, सगळे काही ठीक होईल असे आम्हाला आधी वाटले होते. पण, भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे दिसून येत आहे,” असे त्यांनी पुढे म्हटले.

या खेळाडूंना पाकिस्तान संघातून वगळले जाऊ शकते
जेव्हा पीसीबी अध्यक्ष म्हणाले की, पाकिस्तानी संघावर मोठी शस्त्रक्रिया होणार आहे, याचा अर्थ संघात मोठे बदल होऊ शकतात. अमेरिकेकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघात काही बदल करण्यात आले, ज्यामध्ये आझम खानला बाकावर बसवण्यात आले. पण, भारताविरुद्धच्या पराभवानंतर मोहसीन नक्वीच्या वक्तव्यावरून संघात काही मोठे बदल होणार असल्याचे दिसते. अनेक खेळाडूंना संघातून वगळले जाऊ शकते. पीसीबीच्या कारवाईच्या प्रभावाखाली येणाऱ्या खेळाडूंमध्ये इफ्तिखार अहमद, उस्मान खान यांसारख्या चेहऱ्यांचा समावेश असू शकतो.

अमेरिका आणि भारत विरुद्ध बॅक टू बॅक सामना हरल्यानंतर, पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका आहे. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या संतापाचे हेही एक मोठे कारण असावे.

महत्वाच्या बातम्या-

INDvsPAK | ‘ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो, पण लाज वाटली…’, पाकिस्तानी चाहत्याचा Video Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version