Breaking News

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्ती, 20 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीची होणार अखेर

भारताचा सर्वकालीन महान फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आपल्या कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 39 वर्षाच्या असलेल्या सुनील याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत घोषणा केली. फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील कुवेत विरुद्धचा 6 जून रोजी होणारा सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. (Indian Footballer Sunil Chhetri Annouced Retirement)

सुनील छेत्री हा सध्या भारताचा सर्वात अनुभवी फुटबॉलपटू आहे. आपल्या वीस वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 145 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 93 गोल झळकावले आहेत. विशेष म्हणजे या यादीमध्ये त्याच्यापुढे केवळ अर्जेंटिना लिओनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो हे दोघेच आहेत. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणाऱ्या आपल्या अखेरच्या सामन्यातही गोल झळकावून तो यशस्वी सांगता करण्याचा प्रयत्न करेल.

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याने जवळपास दहा मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो म्हणाला,

“ज्यावेळी मी भारतासाठी पहिल्यांदा मैदानात उतरलो तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर प्रत्येक वेळी एक जबाबदारी घेऊन मी खेळत गेलो. मागील 19 वर्षात मी दबाव आणि खेळाचा आनंद अशा दोन्ही बाजूंचा विचार करत खेळ खेळलो.”

तो पुढे म्हणाला,

“मागील एक-दीड महिन्यांपासून मी थांबण्याचा विचार करत होतो. अखेर मला वाटले आता हीच योग्य वेळ आहे. सर्व आठवणी माझ्या डोळ्यासमोर ताज्या झाल्या आणि त्यानंतर मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.”

सुनील याने या व्हिडिओमध्ये आपले कुटुंब,‌ प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडू तसेच भारतीय फुटबॉल महासंघाचे देखील आभार मानले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये निवृत्त होत असला तरी तो लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

Indian Footballer Sunil Chhetri Announced Retirement

हे देखील वाचा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version